Monday, March 19, 2007

चारोळ्या


माझ्याकडचा शिंपला उघडताच..
दिसला मला एक मोती...
त्याच्या कणाकणात भरली होती..
असीम निस्वार्थ प्रीति..

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

????????????????????????????????????????

प्रेमाचा प्रत्येक रंग
मला तुझ्यामधे दिसतोय
तुझ्यातील रंगांमुळेच
मी प्रेम करायल शिकतोय

***************************************

तुझ्या ओठांवरचे शब्द
माझ्या मुखी थरथरले....
अन माझ्या हृदयातील पाणी
तुझ्या डोळ्यातून झरझरले

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

"चाटे" मधे जावून
प्रेम करायला शिकता येत नाही
काट्यांशिवायचा गुलाब
कधी विकता येत नाही

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

कोरड्या वाटणाऱ्या नारळात
थंड मधुर पाणी असतं
मृगजळ का असेना
वाळवंटातही पाणी असतं

************************************

माडीवरही एकेकाळी
सुंदर गुलाब फ़ुलला होता
पाकळ्या चुरून झाल्यावर
समाज काट्यांकडेही वळला होता

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

कळीला कधी ना कधी
फ़ुलायचचं असतं
काहिंच्या नशिबी कुस्करणं..
काहींना निर्माल्य व्हाव लागतं

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

तो गुलाब म्हणाला.. वाह!..
माझ्या चुरलेल्या पाकळ्यांनाही
तुला प्रीतिचा गंध येतो..
म्हणतात ना...
कुस्करल्याने काहिंचा कचरा कहींचा गुलकंद होतो

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पाऊस होऊन बरसावं म्हंटल
तर तु लाजुन उघडतेस छत्री
म्हणून म्हंटल ढगांना दूर व्हा....
बरसायचं आहे आज चांदणं होऊन रात्री

############################

तुला रोज मी खिडकितचं पहातो
मनातलं सगळं सांगायच ठरवतो
तुझ्यासाठी जरी खुला आसमंत सारा
माझ्यासाठी उरतो फ़क्त खिडकितला नजारा

तुला भेटले ना की
मन हवेत उडु लागते
हवेतल्या हवेत उडताना
तुला कवेत घेउ लागते

,,,,,,,,,,,,,,,,

तुला भेटल ना की
वाटत भेट हिच पहिली
माझ्या मनातील पालवी
डोळ्यात तुझ्या नव्याने फुलली

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

तुला भेटल ना की
पोटातल ओठावर येतं..
तुझ्या एका कटाक्षानेच
ओठांपसुन ते दुर दुर पळतं..

,,,,,,,,,,,,,,,,,

तुला भेटल ना की
सारं काही आठवतं...
तुझ केवळ असणही..
मनात नीट साठवतो

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तुला भेटल ना की
खुप खुप बोलावेस वाटत
मी जरी काही बोललो नाही...
तरी तु डोळ्यांतुन वाचाव अस वाटत

*******************

तु काहिच बोलली नाहिस
मीच फ़क्त बोलत होतो..
आवाज कोणाचाच नव्हता
भावना मुक्यानेच मांडत होतो

तु काहिच बोलली नाहिस
तरी भावना डोळ्यांनेच व्यक्त होते
चांदणं मनसोक्त बरसायला
आवाजाची काहीच गरज नसते


तु काहिच बोलली नाहिस
हे मी lightly कसं घेऊ
मन दौडत असताना
मी एका जागिच कसा राहु

तु काहिच बोलली नाहिस
तरी भावना डोळ्यांनेच व्यक्त होते
चांदणं मनसोक्त बरसायला
आवाजाची काहीच गरज नसते

++++++++++++++++++++++++++++++++

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
सवयीच झालय तुझ मान वळवुन घेणं....
अन माझी पाठ वळताच
तुझं वळुन वळुन पहाणं..


मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तु म्हणतेस छान आहे...
तुझ्या केवळ असण्यानेच
मला स्तुतीचं कुठे भान आहे

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तुझ्या खळीतुन कळी खुलते
फ़ुल जरी लपवलं..
तरी सुगंधानच मन फ़ुलते

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
मन माझं धावत असतं
मी कितीही धावलो तरी
तुझ मन मात्र सावध असत

=========================
तु तिथे अन मि इथे
अस वेगळच आपलं नातं आहे
कितीही लांब असलो तरी...
तु फ़क्त माझी आहेस

तुझ मिनिटभरही जवळ असण..
किती मोठा आनंद आहे...
त्या मिनिटातला प्रत्येक क्षण
तु फ़क्त माझी आहेस
@@@@@@@@@@@ Rushikesh@@@@@@@@@@@@@